Sunday, October 16, 2016

Wednesday, October 5, 2016


kavita


ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडुनिया चित्रकार : राजेंद्र गिरधारी कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ मोकाट मोकाट, अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे विसरुनी भान भूक नि तहान, पायांखाली रान घाली सारे थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तयालागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू, माय! तू लेकरू शोधू येई. — अनिल

अनंत-स्तोत्र

Suresh - सुरेश शिरोडकर येथे ~ बालभारती - मराठी कविता ~ - 1 महिन्यापूर्वी
अनंता, तुझे गोल, तारे तुझे, तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें, तुझी ही कृती रे मनोमोहना, अहोरात्र गाई तुझ्या गायना. तया मूक गानें मना मोहिलें, जगन्नायका, वेड कीं लाविलें; नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें; भरूं लागलो सूर वेडे खुळे. मदीं त्या तुझें रूप गाऊं धजें, स्वयंदीपका दीप दावूं सजें; न द्यावा जिथे पाय तेथे दिला, बहू लाजलों भान येतां मला तुझे लाडके रे, तुझे लाल जे वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजे; करोनी दया रे दयासागरा, क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा. अहो भाग्य माझें जरी या सुरीं सहस्त्रांश त्या गीतिची माधुरीं ! तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी ! रुचो हे तुला स्तोत्र, घे आवरीं. — भा. रा. त... अधिक »

माहेर


चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कापणी

Suresh - सुरेश शिरोडकर येथे ~ बालभारती - मराठी कविता ~ - 1 महिन्यापूर्वी
आता लागे मार्गेसर, आली कापनी कापनी, आज करे खालेवऱ्हे, डाव्या डोयाची पापनी ! पडे जमीनीले तढे, आली कापनी कापनी, तशी माझ्या डोयापुढे, उभी दान्याची मापनी. चित्रकार : राजेंद्र गिरधारी शेत पिवये धम्मक, आली कापनी कापनी, आता धरा रे हिंमत, इय्ये ठेवा पाजवुनी. पीकं पिवये पिवये, आली कापनी कापनी, हातामधी धरा इय्ये, खाले ठेवा रे गोफनी. काप काप माझ्या इय्या, आली कापनी कापनी, थाप लागली पिकाची, आली डोयाले झापनी ! आली पुढे रगडनी, आता कापनी कापनी, खये करा रे तय्यार, हाती घीसन चोपनी. माझी कापनी कापनी, देवा तुझी रे मापनी, माझ्या दैवाची करनी, माझ्या जीवाची भरनी. — बहिणाबाई चौधरी

पलीकडे ओढ्यावर (माझे घर)


पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडाझुडपांत आहे लपलेल्रे माझे घर माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट, मला ओढुनिया नेते माझ्या घराशी ही थेट पिंपळाच्या झाडाखाली लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर माझी आई येते दारी माझ्या भावंडांचा मेळा, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा कमा सुमा अरु चंदू भाऊ आला म्हणतात मिठी मग सोडवावी हातावर खाऊ देत — गणेश कुडे संकल्पना : कु. भक्ती परब, मुंबई

पोपट


पोपटा, पोपटा, बोलतोस गोड, पण झालास रोड. खा ना जरा पेरूची फोड, भाऊ, भाऊ, बोलतोस गोड देतोस फोड. दार उघड आणि मला सोड भाऊ, भाऊ, रानात जाईन, फळे खाईन, डहाळीवर बसून झोके घेईन. — सरला देवधर

झाडांचं मूल


डोळे उघडून म्हणालं फूल, झाडाचं मी आहे मूल ! अंगावर माझ्या कपडे रंगीत, वाऱ्याचं मी ऐकतॊ संगीत ! फुलपाखरं मला भेटायला येतात, भोवती भुंगे गाणी गातात ! उन्हात मी मांडतो खेळ, मजेल जातो सारा वेळ ! झाडाच्या मी खांद्यावर बसतो, आनंदानं मी गालात हसतो ! — शं. ल. नाईक * ज्येष्ठ बालसाहित्यिक शं. ल. नाईक यांनी स्वतः फोन करून सदर कविता ब्लॉगवर घेण्याची सूचना केली. संकलक त्यांचा आभारी आहे. *

 

महाराष्ट्र शासन(Maharahstra govt)

महाराष्ट्र शासन-शासन निर्णय(Maharahstra govt. GR search)
माहितीच अधिकार(Right to Information (Central Govt.))
इंदिरा आवास योजना (Indira Awas Yojana)
Ministry of Rural Development (DRDA)
Z.P. Sangram Related softwares links as below
1. Sangram Soft
2. National panchyat portal
3. National panchayat Profiler/ Area Profiler
4. Priyasoft software
5. Social audit
MGNREGA
NRHM Relate software links as below
1. Mother & Child Tracking System (MCTS)-For Tracking of Pregnant Women & Child
2. District Health Information System (DHIS-2)-For All Health Factors
3. Health Management Information System (HMIS)-For a Health Management
4. Infrastructure Development Wing (IDW)-For Contruction Tracker
5. Public Health Department
Sarv Shiksha Abhiyan related software links as below
About State Head office
web portal expenditure
U-DISE
School Report Card

शासनाच्या महत्वाच्या लिंकस्



महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन कृषि मंत्रालय
महाराष्ट्र शासन सिंचन मंत्रालय
महाराष्ट्र शासन गा्रमविकास मंत्रालय
महाराष्ट्र शासन जलसंधारण मंत्रालय
महाराष्ट्र शासन समाजकल्याण मंत्रालय
महाराष्ट्र शासन शिक्षण मंत्रालय
महाराष्ट्र शासन बांधकाम मंत्रालय
कृषि विषयक
कृषि विषयक
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विदयापिठ